पैसे दुप्पट करण्याच्या घोटळ्याबाबत ऐकले आहे?

Tanya Sharma
PhonePe
Published in
3 min readJul 28, 2022

यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत इथे सर्व जाणून घ्या

आजकालच्या जगात घोटाळेबाज लोक पैसे लुटण्यासाठी नवनवीन कल्पक मार्गांचा अवलंब करतात. ते काळजीपूर्वक एक फसवणूकीची योजना तयार करतात जी कायदेशीर भासते आणि साध्याभोळ्या लोकांना फसवले जाते. एका रात्रीत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देणे हे लोकांना लालूच दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक आहे.

पैसे दुप्पट करण्याचा घोटाळा कसा केला जातो

उदाहरण 1: एका छोट्या वित्तीय व्यवसायाचा प्रतिनिधी असल्याच्या खोट्या बहाण्याने घोटाळेबाज तुमच्याशी संपर्क करतात. ते असा दावा करतात की हा व्यवसाय अतिशय कमी कालावधीत छोट्या गुंतवणुकीवर उच्च परतावा देतो. तुमच्या पैशांची झपाट्याने वाढ होऊ शकते यावर तुमचा विश्वास बसावा यासाठी ते तुम्हाला थोडीशी गुंतवणूक करायला लावतात आणि नंतर दुप्पट पैसे परत करतात. एकदा त्यांनी तुमचा विश्वास संपादन केला की ते तुमच्याकडून मोठी रक्कम लुबाडतात.

उदाहरण 2: तुम्हाला SMS किंवा Whatsapp द्वारे एक संदेश प्राप्त होतो ज्यात तुमची क्रेडिट कार्डच्या वापराची उच्च वारंवारता किंवा तुमच्या बचत खात्याच्या उच्च बॅलेन्समुळे तुम्ही एक आकर्षक ऑफर जिंकली असल्याचा आणि ही ऑफर तुमच्याकडे मर्यादित कालावधीसाठी असून ती तुम्हाला खूप कमी कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करून देईल असा दावा यात केला असतो. ते एक लिंक शेअर करतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे जमा करायचे असतात आणि तुम्ही पैसे जमा केलेत तर तुम्ही फक्त लुबाडलेच जाता.

पैसे दुप्पट करण्याच्या घोटाळ्यापासून तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता याबाबत पुढे सांगितले आहे

  1. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका : घोटाळेबाज समान्यतः तुम्हाला एक लिंक पाठवतात ज्याद्वारे तुम्हाला रिटर्न किंवा गिफ्ट कार्ड मिळेल. अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
  2. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर, CVV, पिन, OTP इत्यादी वैयक्तिक माहिती कोणलाही शेयर करू नका : व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक माहितीसाठी कायदेशीर संस्था तुम्हाला कधीही कॉल, ई-मेल किंवा मेसेज पाठवणार नाहीत. तुम्हाला PhonePe चे प्रतिनिधी असल्याची बतावणी करणाऱ्या कोणाही व्यक्तीने असे तपशील विचारल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. फक्त @phonepe.com डोमेनहून आलेल्या ई-मेलवर प्रतिसाद द्या.
  3. संपर्क माहिती मिळविण्यासाठी नेहमी कायदेशीर वेबसाइट वापरा : जर तुम्हाला एखाद्या वित्तीय संस्थेकडून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून कॉल आला आणि तो/ती तुम्हाला त्याच नंबरवर परत कॉल करण्यास सांगत असेल. तुम्ही परत कॉल करण्यापूर्वी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर नंबर तपासा.
  4. नेहमी लक्षात ठेवा PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कधीच ‘पेमेंट’ करण्याची किंवा तुमचा UPI पिन टाकण्याची आवश्यकता नाही.
  5. कृपया ‘पेमेंट करा’ बटन दाबण्यापूर्वी किंवा तुमचा UPI पिन टाकण्यापूर्वी तुमच्या PhonePe ॲप वर दर्शवलेला व्यवहाराचा मॅसेज काळजीपूर्वक वाचा.
  6. PhonePe ग्राहक सहाय्यता नंबरसाठी Google, Twitter, FB इत्यादी वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी https://phonepe.com/en/contact_us.html हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे.
  7. PhonePe सहाय्यता असल्याचा दावा करणाऱ्या असत्यापित मोबाइल नंबरवर कधीही कॉल करू/प्रतिसाद देऊ नका.

तुम्हाला फसवणूक करणाऱ्याने संपर्क केल्यास तुम्ही काय करायला हवे?

  • तुमच्या जवळच्या सायबर-सेल गुन्हा शाखा कडे ताबडतोब याची नोंद करा आणि पोलिसांना संबंधित तपशील (फोन नंबर, व्यवहार तपशील, कार्ड नंबर, बँक खाते इ.) देऊन FIR दाखल करा. याशिवाय तुम्ही पुढील लिंकवर — https://cybercrime.gov.in/ टॅप करू शकता किंवा ऑनलाइन सायबर तक्रार दाखल करण्यासाठी सायबर सेल पोलीसांकडे 1930 वर संपर्क साधू शकता.
  • तुम्हाला PhonePe द्वारे संपर्क केला असल्यास, कृपया PhonePe ॲपवर लॉगिन करा आणि ‘मदत’ विभागावर जा. तुम्ही फसवणूकच्या घटनेचा रिपोर्ट ‘Account security issue/ Report fraudulent activity’ अंतर्गत करू शकता. याशिवाय तुम्ही support.phonepe.com वर लॉगिन करू शकता.
  • केवळ आमच्या अधिकृत खात्यावरून आमच्याशी संपर्क करा.

Twitter: https://twitter.com/PhonePeSupport

वेबसाइट: support.phonepe.com

--

--