PhonePe सादर करत आहे भारतातील पहिला सुपर फंड

Tanya Sharma
PhonePe
Published in
3 min readAug 17, 2021

--

सुपर फंड म्हणजे काय आणि तुम्ही त्यात गुंतवणूक करावी का असा प्रश्न पडलाय?

तर मग हे वाचा.

म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहे का?

म्युच्युअल फंडबद्दलची चर्चा तुम्हाला गोंधळात टाकते का? खरं तर हे खूप सोपं आहे.

म्युच्युअल फंडचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात:

1) इक्विटी फंड यात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि उच्च जोखमी असतात. परंतु याद्वारे मिळणारे परतावेही उच्च असतात.

2) डेब्ट फंड यात सरकार (Gilts) किंवा बँकांसमवेत अन्य कॉर्पोरेट्सद्वारे जारी केलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, यात साधारणतः कमी जोखीम आणि स्थिर परतावे असतात.

3) हायब्रिड फंड हे इक्विटी आणि डेब्ट अशा दोन्ही साधनांमध्ये गुंतवणूक करतात, यात जोखीम आणि परतावे मध्यम असतात.

फंड ऑफ फंड म्हणजे काय आणि त्यांचे कार्य कसे चालते?

फंड ऑफ फंड (FOF) अनेक फंडांमध्ये गुंतवणूक करते आणि गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता आणि जास्त परतावा देण्याचे उद्दिष्ट ठेवते. तथापि, बहुतेक म्युच्युअल फंड कंपन्या क्लोज्ड फंड ऑफ फंड ऑफर करतात. म्हणजेच त्या स्वतःला त्यांच्या स्वतःच्या कंपनीकडून फंड निवडण्यासाठी मर्यादित ठेवतात. सामान्यत: म्युच्युअल फंड कंपन्या काही क्षेत्रांमध्ये सामर्थ्यवान असू शकतात, परंतु काही इतर क्षेत्रात कमकुवत असतात. हे प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्तम फंड निवडण्याची FOF ची क्षमता प्रतिबंधित करते.

ओपन सुपर फंड सुरू करा!

सुपर फंड विविध फंड हाऊसमधून सर्वोत्तम फंड निवडतात आणि म्हणून ते एकाच कंपनीच्या फंड ऑफ फंडच्या कमतरता दूर करू शकतात. उदाहरणार्थ, आदित्य बिर्ला सनलाइफ (ABSL) इक्विटीमध्ये खूप सामर्थ्यवान असू शकते, तर अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड डेब्ट (कर्ज)मध्ये सामर्थ्यवान असू शकते, म्हणूनच सर्वोत्तम ओपन फंड तयार करण्यासाठी ABSL कडून सर्वोत्तम इक्विटी फंड आणि अ‍ॅक्सिसकडून सर्वोत्तम डेब्ट फंड निवडणे अर्थपूर्ण आहे.

सर्वात उत्तम: PhonePe वरील सुपर फंड

PhonePe वरील सुपर फंड सोल्यूशन विविध म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सर्वोत्तम फंड निवडते. यानंतर तीन भिन्न पर्याय ऑफर करते, जसे की कंझर्व्हेटिव्ह फंड, मॉडरेट फंड आणि अ‍ॅग्रेसिव्ह फंड. याद्वारे तुम्ही सर्वोत्तम जोखीम आणि परतावा संयोजन निवडू शकता.

PhonePe वरील सुपर फंड पुढील काही कारणांमुळे वेगळे ठरतात

  • हा अतिशय सोपा आणि सर्वसमावेशक उपाय आहे, याद्वारे तुम्हाला तुमच्या जोखमीच्या क्षमतेवर आधारित तुमच्यासाठी योग्य सुपर फंड ठरवायचा असतो. बाकी सर्व तुम्ही तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांवर सोडू शकता, जे गुंतवणूक करण्यासाठी योग्य निधी निवडतील आणि तुम्ही निवडलेल्या सुपर फंडवर आधारित प्रत्येक फंडमधील गुंतवणुकीचे प्रमाण ठरवतील.
  • तज्ज्ञ फंड व्यवस्थापक गुंतवणुकीवर सतत देखरेख ठेवतील आणि आवश्यक असल्यास, पोर्टफोलिओमध्ये विविध फंडच्या वाटपामध्ये बाजारातील वातावरण आणि अंतर्निहित निधीच्या सुसंगततेनुसार, कर कार्यक्षम मार्गाने बदल करतील. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडणे आणि सतत चालू असलेल्या फंडचा मागोवा घेणे यासारख्या कठीण वाटणाऱ्या गोष्टींची काळजी घेतली गेल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळतो.
  • सुपर फंड विविध म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसह फंड रचनेच्या ओपन आर्किटेक्चर फंडचे अनुसरण करतात, यामध्ये AMC मध्ये सुसंगत योजना निवडण्याचा आणि फंड व्यवस्थापक शैलींमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न असतो.
  • सुपर फंडने म्युच्युअल फंडमध्ये ‘परवडण्यायोग्य’ बेंचमार्कची नव्याने व्याख्या केली आहे. कारण गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड योजनांच्या ठोस पोर्टफोलिओमध्ये ₹500 इतकी कमी गुंतवणूकही करू शकतात. अशा प्रकारे लहान गुंतवणूकदारालाही आता दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उत्कृष्ट सोल्यूशनमध्ये प्रवेश मिळतो.
  • सुपर फंड 3 वर्षांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श आहेत आणि जर गुंतवणूक 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवली गेली असेल, तर त्यांना इंडेक्सेशन फायदे मिळतात, जे त्यांना बँक मुदत ठेवींसारख्या पारंपारिक गुंतवणुकीच्या तुलनेत, जवळजवळ इक्विटी फंडांच्या बरोबरीने कर-कार्यक्षम बनवतात.
  • तुम्ही फक्त गुंतवणूक करा आणि निर्धास्त राहा.

--

--

More from Tanya Sharma and PhonePe