Nagrik, 2015 — ★★

Marathi film industry is a force to reckon with. Despite lesser budgets, what it produces is definitely better than much of mainstream Bollywood. This comparison is irrelevant, but it is a common measuring scale. It also has lowest units for easy measurements. Time and again, Marathi industry needs some reality check. There is a need of movies which tell us that it is going off course. These movies help the industry as a whole to course correct and reconnect with the audience. Nagarik is one which has gone off course, way too much.

Nagarik is a story of a journalist who is frustrated with the rampant corruption, dirty politics all around him. The story is about frustration and his feeble attempts. The trailer is promising, but the movie hardly is. The story has a good concept. Unfortunately, in the two hours we see the concept handled carelessly and cluelessly. It is painful to see the narrative disintegrating in front of you. There are really too many plot holes and WTF moments to count.

The movie has stalwarts of Marathi industry. Acting powerhouses who were present since the beginning of an era. Actors who have mesmerized a generation of audience. Yet the movie fails to make optimum use of that potential. You are forced to sit through a story where everyone is restrained, and poorly directed. It is genuinely painful to see some cream of the talent wasted. It is like, you got for unlimited Thali in the hopes of unlimited dessert, but you don’t get more than a spoonful of it for some reason.

The direction and cinematography reminded me of Rann, a 2009 RGV film. The camera angles are annoying, at times aggravating. The way it is shot comes in the way of what is shot. This is never a good thing. The film employs a lot of close-ups, zoomed in views. It frequently places the camera behind semi-transparent doors, curtains and what not. The long, steady shots are tiring and hollow. They offer nothing. At times, the movie feels like a long showcase of candid photography. I don’t really see the movie medium this way.

The sound is sporadic. There are vacant and hollow backgrounds without a sound and suddenly there is a heavy music that hurts you.

I want to draw attention to an attempt of being pensive and meaningful by becoming unconventional. Ship of Theseus did that. The long silences and zoomed out steady frames had a huge impact in that film. The content and presentation had primed the user to fill that silence with his/her own thoughts in Theseus. Similar attempts in this movie have fallen flat. It results in severing the whichever feeble connection the audience has with the plot.

Overall, I did not like the film. Period. I am giving it 2 and asking you to skip it. This is me being generous. I initially decided on 1.5 but then, Milind Soman was an unexpected pleasure so a bonus half.

राहवत नाहीये म्हणून थोडं मराठीत लिहितो. बुद्धिबळाच्या हस्तिदंती सोंगट्यांनी सापशिडी खेळायची नसते. सापशिडी, लुडो आणि बरंच काही त्याने सहज खेळता येतं, पण त्या त्या खेळांसाठी बनलेल्या नसतात. स्वतःचं हसं करून घेण्यापलीकडे त्यातून काहीही साध्य होत नाही.

सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि दस्तुरखुद्द नटसम्राट डॉ श्रीराम लागू अशी कडक माणसं असताना त्यांना वाया घालवणे हा निव्वळ अपराध म्हणून मोजायला हवा. आणि ह्यात मी अजून सचिन खेडेकरला मोजलेलं देखील नाही. गेलाबाजार मिलिंद सोमणने सुद्धा सुंदर काम केलेलं आहे. आता गोंधळ असा झालाय की स्वतः दिग्दर्शकाला ह्या चित्रपटाचा आवाका झेपलेला नाही. आहेत नाहीत त्या सर्व समस्या कढईत ढकलून चांगल्या सिनेमाची पाव भाजी करण्यात काय हशील?

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला पत्रकार आणि राजकारणी हा संघर्ष जरी अजून चांगला रंगवला असता तरी खरच एक चांगलं कथानक उभं राहिलं असतं. पण ह्या संघर्षाला तात्विक बैठक देऊन अधिक सबळ करण्याऐवजी, राजकारण्यांना आहेत नाहीत ती सर्व पापं करायला लावून अगदी काळं कुट्ट केल्यावर कसला आलाय वैचारिक संघर्ष? ह्या नंतर उरते ती एक औपचारिकता. भावनिक दृष्ट्या, पाहणारे सगळे, खलनायकाला मनातल्या मनात फाशी देऊन मोकळे झालेले असतात. तसच काहीसं पडद्यावर होताना पाहणं एवढा एकच पर्याय आपल्या समोर ठेवलेला असतो. असे तद्दन सरळसोट चित्रपट बनूच नयेत का? तर असं नाही. वर म्हणल्याप्रमाणे सापशिडी खेळूच नये का ह्या प्रश्नालाही अर्थ नाही.

सचिन खेडेकर दोन मुलींचा बाप, बायको कॅन्सरग्रस्त. झकास भावनिक मसाला तयार आहे. ह्या एका अनुभवी पत्रकाराला आयुष्याच्या (आणि नोकरीच्या) उत्तरार्धातच पत्रकारितेबद्दल मूलभूत प्रश्न का पडावे? वास्तवातल्या भयाणतेने जीव कासावीस होण्याइतका मानसिकरीत्या कोवळा जर तो असेल तर कारकीर्दीच्या पूर्वार्धात तो काय गोट्या खेळत होता की शाळांच्या वार्षिक समारंभांचं वार्तांकन करत होता? नोकरी नाही, लवकरच खायची भ्रांत असलेला माणूस खुशाल रिक्षानी फिरतो, महागड्या ठिकाणी सुरापान करतो. त्याच्या मित्रांबद्दल आणि त्या अद्वितीय मैत्रीबद्दल न बोललेलंच बर. एकच सांगणं की प्रेक्षकाला अध्यारूत धरू नका. ‘नवरा माझा नवसाचा’ पाहणारा प्रेक्षक ‘नागरिक’ला येत नाही, एवढी जाणीव असली म्हणजे झालं.

हा एवढा वैताग किंवा त्रागा कशासाठी? तर अपेक्षाभंग. श्रीराम लागू आणि दिलीप प्रभावळकर. नीना कुलकर्णी आणि सुलभा देशपांडे. कथानक ह्यांना एकदाही समोरासमोर आणत नाही. पानभर संवाद आहेत प्रत्येकाच्या वाट्याला. नीना कुलकर्णी अगदी जेंव्हा भावूक होते आणि आवंढा गिळते, तेव्हा कॅमेरा डीफोकस करणे म्हणजे करंटेपण नाहीतर काय? सचिन खेडेकर हा एक गुणी अभिनेता असला तरी सगळीकडे ताणून बांधलेल्या नगाऱ्यासारखा वाटतो. मिलिंद सोमण ही एक अनपेक्षित झुळूक एवढ्या पाउस न पडलेल्या जूनच्या उकाड्याला कशी काय मारेल? भरवश्याच्या म्हशीला…

मराठी चित्रपट आता परिपक्व, पोक्त झाला वगैरे म्हणताना असे मिठाचे खडे मधे मधे यायचेच. त्रास अशासाठी की ह्या सर्वांना एकत्र पहाण्याचा योग चुकला. आता परत केंव्हा येईल तेंव्हा येईल. असो… ह्यातून सावरण्यात काही दिवस जातील. तोपर्यंत किल्ला येतोच आहे, त्याला आम्ही असणारच ‘हजर’. नाहीतर संदूक पण पाहीन कदाचित.

ता. क. : देविका दफ्तरदार बाकी झकास. अगदी सहज, नैसर्गिक. आवडली.

[ad name=”eCom2"]

Like what you read? Give Rorschach Butterfly a round of applause.

From a quick cheer to a standing ovation, clap to show how much you enjoyed this story.