Poems by P.L. Deshpande

Kedar Nimkar
Shadja
Published in
2 min readFeb 2, 2017

Few poems from one of my favourite Marathi author.

मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो,

तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ,
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम,
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे

‘खुदकन् हसू’ चे पैसे आठ
‘खो खो खो’ चे एकशे साठ,
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा — कुणी वंदा

कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच?
हा लेकाचा शहाणा की खुळा?
मग मी मारतो मलाच डोळा

च्यालेंज

अहो ज्ञानियांच्या राजा।
कशाला फुकाच्या गमजा?

एकेकाळी रचीली ओवी।
व्हाल का हो नवकवी?

मारे बोलवीला रेडा।
रेघ बी. ए. ची ओलाडां!
तुम्ही लिहावी विराणी।
लिहा पाहू फिल्मी-गाणी

म्हणे आळंदी गावात।
तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी
एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा।
आमुचा च्यालेंज स्विकार

फोटोतली तरुणी

माझ्या खोलीतल्या
फोटोतली तरूणी परवा

मला म्हणाली
‘मला चागंलेसे स्थळ
शोधून द्या ना-इथे
माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय’

प्रश्न

आताशा बुडणा-या सुर्याला
‘बराय उद्या भेटू’

असे म्हणाला की तो मला म्हणतो,
‘कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
‘सुर्य आता म्हातारा झालाय.’

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.

आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.

म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.

कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा

एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!

Borrowed from here

--

--