नव्या वाटा

Mayuresh Phadke
Writings by Mayuresh
1 min readJul 23, 2016

दिवस उगवतो
मला खुणावतो

नव्या दिशा
नव्या वाटा
नवीन क्षितिजे दाखवतो

त्या नवीन वाटांवरून
मग धावत निघतो मी

नवी क्षितिजे सर करायला
अधिर होउन पळतो मी

धावत पळत असताना
कालचा दिवस बोलवतो

कालच्या राहुन गेलेल्या वाटा
पुन्हा पुन्हा दाखवतो

नित नवीन शोधताना
कालच्या वाटा विसरून जातात

त्यांच्या पर्यंत पोचण्या आधीच
स्वप्नां मध्येच विरुन जातात

रोज धावपळ करता करता
पोचत कधी कुठेच नाही

नव्या वाटेवर धावण्याची मजा मात्र
काही केल्या सरत नाही

If you enjoyed this, read some other poems by Mayuresh

--

--

Mayuresh Phadke
Writings by Mayuresh

Dreamer | Interests: Food, Cooking, Music, Movies, Poetry