वारी

Mayuresh Phadke
Writings by Mayuresh
1 min readJul 9, 2018

माउलींच्या संगे
चालू पंढरीची वाट
लागे भेटीची आस
विठ्ठलाच्या

घेऊ मुखाने नाम
जाऊ विसरून भान
नादात हरवून
टाळ मृदूंगाच्या

नाही कामाची चिंता
ना जगाची काळजी
सोडले सगळेच पायी
पांडुरंगाच्या

विठ्ठल विठ्ठल म्हणता
सरत जाई वाट
निमिषात होई प्रवास
कोसा कोसांचा

वारी पंढरीची
करता माउलींच्या संगे
मन शोधे वाटा
अंतरीच्या

--

--

Mayuresh Phadke
Writings by Mayuresh

Dreamer | Interests: Food, Cooking, Music, Movies, Poetry