#MersalVsModi नेमकं काय आहे??

Mersal Poster

#MersalVsModi हा ट्रेंड कालपासून सोशल मिडीयावर धूमाकुळ घालतोय. नेमकं काय आहे या ट्रेंड मागे??
तर मेरसल हा एक नुकताच रिलीज झालेला तमिळ चित्रपट आणी चित्रपटाचा नायक आहे साक्षात ‘सुपरस्टार विजय’. या चित्रपटात एक डायलॉग आहे कि “सिंगापूर आणी इतर देशात GST 7% असून सर्व मेडिकल सेवा मोफत आहेत, तर भारतात GST 28% असूनहि मेडिकल सेवा फ्री का नाही ??” ह्या पंच डायलॉग ने मोदीसरकार चांगलच हादरलयं.

तामिळनाडू भाजप ने या चित्रपटातून हा डायलॉग डिलीट करण्याची मागणी केली आहे. या गळचेपी ला कमल हसन पासून ते सर्वसामन्य तमिळ तरुणांनी कडकडून विरोध केलाय. त्यातच टाइम्स नाऊ ने (कृपया बीजेपी नाऊ वाचा!) उताविळपणे #MersalVsModi हा हॅशटॅग सुरु केला, त्यावर तमिळ जनता तुटून पडली.

ह्या सगळ्यात एक मुद्द्या प्रामुख्यान समोर आलो तो म्हणजे एका चित्रपटातील पात्र सरकारच्या धोरणावर भाष्या करू शकत नसेल तर तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय बात? या ट्रेंड मध्ये जवळपास सगळ्यांनाच प्रखरतेन जाणवलेला हा मुद्दा.

मला तर हा डायलॉग चिक्कार आवडून गेला. जलिलकट्टु च्या वेळेस खुलेआम पाठींबा असो का #SaveFarmers अभियान असो अशा व्यापक सामाजिक भूमिकांमुळे विजय तमिळ तरुणाईच्या गळयातलं ताईत बनला आहे. आणी ह्या मूर्खपणा मुळे आता भाजप ने आपला तामिळनाडूत पाय टाकण्याचा दरवाजा कायमचा बंद केला असे मी स्पष्ट सांगू शकतो, कारण आंध्रप्रदेश व तामिळनाडू चे राजकारण पूर्णपणे सिनेमा केंद्रित आहे. त्यात विजयशी पंगा घेणे मोदीना कधीच परवडणार नाहीये. कारण हाच तो विजय आहे, ज्याला भेटल्याशिवाय मोदींनी 2014 लोकसभा निवडणुकांचा प्रचार तामिळनाडूत सुरु केला नव्हता.
-गुणवंत सरपाते

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.