सोन्याची डायरी

Ambarish Chaudhari
zehn
Published in
1 min readSep 30, 2017

डायरी किती निष्पक्ष असते,
सगळे दिवस सारखेची
आज आहे दसरा आणि,
दिवाळी दुसऱ्या तारखेची

पेन कितीही महागडे असो
किंमत तिला शब्दांची
डायरीला नसते पर्वा
काल उद्याची, परवाची

पानापानांवर घेत असते
नोंद छोट्या मोठ्याची
सोनं कुणाचं लहान मोठं
पानं तर शेवटी आपट्याची

आयुष्याच्या ह्या डायरीत
कोंबाकोंब स्वप्नांची
"अजून अर्धीच भरली हो!"
बोंबाबोंब सर्वांची

जगाबरोबर लोकही पसरले
पानं पोचेनात आपट्याची
डायरीच्या पानांवर तरीही
नावं आहेत आपुल्यांची

--

--

Ambarish Chaudhari
zehn
Editor for

making my way through mist of magic over lanes of logic